अपघाताची मोठी शक्यता
पनवेल : वार्ताहर – पनवेल बाजूकडून औद्योगिक वसाहतीच्या मागे खांदा वसाहतीत जाण्यासाठी रेल्वे रूळाखालून उभारण्यात आलेल्या बोगद्याची सध्या अवस्था खराब होत चालली आहे. त्यामुळे प्रशासनाने दुरूस्ती न केल्यास मोठी रेल्वे दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या इथून अमरधामकडे येण्यासाठी जो मधला रस्ता आहे. त्या रस्त्यावर रेल्वे ट्रॅकच्या खाली जो बोगदा आहे. त्या बोगद्याची ताबडतोब डागडुजी होणे अतिशय महत्वाचे आहे. अन्यथा मोठा अपघात होऊ शकतो. याबाबत तातडीने लक्ष द्यावे व योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी तेथील रहिवासी व प्रवासी वर्ग करीत आहेत. सध्या लॉकडाऊनच्या काळात रेल्वे सेवा बंद असल्याने डागडुजी करण्याचे काम करण्यास कोणताही अडथळा येणार नाही. तरी याबाबत संबंधित शासनाने लक्ष घालावे अशी मागणी जोर धरत आहे.