पनवेल ः बातमीदार
महावितरण कंपनीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माणिक राठोड कार्यकारी अभियंता पनवेल शहर विभाग, जयदीप नानोटे अति. कार्यकारी अभियंता पनवेल शहर उपविभाग, आर. जे. पाटील अति. कार्यकारी अभियंता खारघर उपविभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत या रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. या वेळी संबंधित अधिकार्यांनी रक्तदान करून मानवतेची सेवा केली. या वेळी महावितरणच्या कर्मचार्यांसह नागरिकांनी असा जवळपास 200 हून अधिक जणांनी या शिबिराचा लाभ घेतला. परतीच्या पावसाने मुसळधार पावसाची चिन्हे दिली असतानाही रक्तदात्यांनी तितक्याच उत्साहाने रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या रक्तदान शिबिरात एकूण 200 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. पनवेलमधील आतापर्यंतच्या रक्तदान संकलनातील हा एक उच्चांक प्रस्थापित झाला आहे. एकूण 200 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदानासाठी फॉर्म भरले होते. यातील काही जण रक्तदानासाठी आरोग्यदृष्ट्या योग्य ठरले नसले, तरी रक्तदान शिबिराला तितक्याच उत्साहात मिळालेल्या पाठिंब्यामुळे महावितरणच्या अधिकार्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या वेळी घाटकोपर येथील सर्वोदय रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी या संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की, आम्ही संकलित केलेलं हे रक्त आम्ही लहान मुलांसाठी वापरीत असल्यामुळे आम्ही घेतलेल्या सर्व शिबिरांचा लहान मुलांसारख्या रुग्णांना अधिक फायदा होतो.