नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोनाच्या या संकटकाळात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभाव त्यावरही दिसतोय. तरुणांनी प्रत्येक दिवशी नवे कौशल्य (स्कील) शिकणे गरजेचे आहे. हीच आता काळाची गरज आहे. कौशल्यामध्ये फार मोठी ताकद आहे जी माणसाला कुठल्या कुठे पोहोचवू शकते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 15) केले. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान ते मार्गदर्शन करीत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, आजचा दिवस 21व्या शतकातील तरुणांना समर्पित आहे. कौशल्य ही तरुणांची सर्वात मोठी शक्ती आहे. बदलत्या पद्धतींनी कौशल्य बदलले असून, आपले तरुण बर्याच नवीन गोष्टींचा अवलंब करीत आहेत. कोरोना संकटात आजच्या युगात कसे पुढे जायचे, असा प्रश्न लोक विचारतात. कौशल्य अधिक बळकट करणे हा एकच मंत्र आहे. आता आपल्याला नेहमीच नवीन कौशल्य शिकावे लागेल.
कौशल्याप्रती आपल्यात आकर्षण नसेल, काही नवीन शिकण्याची आवड नसेल तर आपले जीवन थांबते. एका प्रकारे ती व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्त्वाला ओझे बनवून टाकते. तर दुसरीकडे ज्या व्यक्तिला कौशल्याबाबत आकर्षण आहे त्याच्या जीवनाला ताकद मिळत राहते, जीवनात उत्साह वाढतो. स्किल म्हणजे केवळ रोजी-रोटी आणि पैसे कमाविण्याचे साधन नाही तर जीवनात उत्साह आणण्याचे साधन आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ‘यूएन’मध्ये बोलणार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी संयुक्त राष्ट्रात अतिशय महत्त्वपूर्ण संबोधन करणार आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या 75व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला न्यूयॉर्कमध्ये होणार्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील विजयानंतर मोदींचे हे पहिलेच भाषण असेल.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …