Breaking News

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा सीबीएसई दहावीच्या परीक्षेचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत 100 टक्के यशाची परंपरा यंदाही राखली आहे.
अक्षत पांडे 98.80 टक्के गुण मिळवून विद्यालयातून पहिला आला आहे. त्याने आयटी, गणित व सोशल स्टडीज या तीन विषयांत 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत. अवनी तांबूलवाडकर हिने 98.20 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला. तिने सोशल स्टडीज विषयात 100 गुण प्राप्त केले आहेत, तर इशित दवे 98 टक्के गुण मिळवून तिसरा आला. त्याला सोशल स्टडीज व आयटी या विषयांत 100 गुण मिळाले आहेत.
विद्यालयातील 20 विद्यार्थ्यांनी 95 टक्क्यांपेक्षा जास्त, 64 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक, 145 विद्यार्थ्यांनी 80 टक्क्यांपेक्षा जास्त, 169 विद्यार्थ्यांनी 75 टक्क्यांहून अधिक आणि सर्व 197 विद्यार्थ्यांनी 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले.
आयटी या विषयात विद्यालयातील 11 विद्यार्थ्यांना, सोशल स्टडीजमध्ये चार विद्यार्थ्यांना आणि इंग्रजी व गणित विषयात प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजेच 100 गुण मिळाले आहेत. सायन्समध्ये एका विद्यार्थ्याला आणि मराठीत तीन विद्यार्थ्यांना 99 गुण मिळाले. हिंदी व एफएमएम या विषयांमध्ये प्रत्येकी चार विद्यार्थ्यांना 98, तर बेसिक मॅथ्समध्ये एका विद्यार्थ्याला 97 गुण मिळाले आहेत.
संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि प्राचार्य राज अलोनी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply