नागोठणे : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील अधिस्वीकृतीधारल ज्येष्ठ पत्रकार अद्यापही निवृत्ती वेतनापासून वंचित, या मथळ्याखाली दैनिक रामप्रहरमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर त्याची राज्य शासनाकडून तातडीने दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे हे पत्रकार ‘रामप्रहर’ला धन्यवाद देत आहेत.
रायगड जिल्ह्यातील 11 ज्येष्ठ पत्रकारांना पुढील महिन्यापासून निवृत्ती वेतन अर्थात पेन्शन चालू करण्यात येईल, असे शासनाकडून सूचित करण्यात आले आहे. रायगड जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नवीन सोष्टे यांच्या मागणीनुसार ‘रामप्रहर’ने हे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर रायगडाच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यात विशेष लक्ष घातल्याने
हा प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लागला असल्याचे स्पष्ट होत आहे.