
पनवेलमधील शिवसेनेचे अभिजित सिंग कोहली आणि मंगेश सिसोदे यांनी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात शुक्रवारी जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या वेळी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, हाजी सय्यद उपस्थित होते.