Breaking News

महापुरुषांकडून लढण्याचे बळ मिळते

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे उद्गार, वीर वाजेकर यांना विनम्र अभिवादन

उरण : वार्ताहर

उरणच्या आणि रायगडच्या विकासात वीर वाजेकरांनी दिलेले योगदान मोठे आहे. ते पाहता  त्यांना आपण विसरू शकत नाही. त्यांच्यासारख्या महापुरुषांकडून लढण्याचे बळ मिळते, असे उद्गार रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी फुंडे येथे पुण्यतिथी कार्यक्रमात काढले.

रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील फुंडे येथील तु. ह. वाजेकर विद्यालय व वीर वाजेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वीर वाजेकर पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी (दि. 15) करण्यात आले होते. त्या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. रयतमध्ये शिकलो म्हणून रामशेठ झालो, असेही त्यांनी आवर्जुन सांगितले.

या कार्यक्रमास ‘रयत’चे जनरल बॉडी सदस्य सुधीर घरत, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य पी. जे. पाटील, भावना घाणेकर, फुंडे हायस्कूलचे चेअरमन कृष्णाजी कडू, सदस्य उमेश म्हात्रे, प्राचार्य डॉ. गोरख सांगळे, मोहन पाटील, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

पी. जे. पाटील यांनी वाजेकरांच्या स्मृतींना उजाळा दिला व वाजेकरांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आपल्या भाषणात सांगितले. कृष्णाजी कडू यांनी हायस्कूलच्या स्थापनेसाठी वाजेकरांनी घेतलेल्या अथक परिश्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरख सांगळे यांनी केले व महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. सूत्रसंचालन प्रा. प्रवीण गायकर यांनी केले; तर आभार डॉ. आबासाहेब सरोदे यांनी मानले.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply