पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये बॅडमिंटन ऑर्गनायझेशन रायगडच्या संयुक्त विद्यमाने रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 16) झाले. दरम्यान, आमदार प्रशांत ठाकूर यांनी या स्पर्धेस भेट देत आयोजकांचे कौतुक केले आणि खेळाडूंना शुभेच्छा व प्रोत्साहन दिले. या वेळी बॅडमिंटन ऑर्गनायझेशन रायगडचे सेक्रेटरी डॉ. डेव्हिड अल्वारीस, उपाध्यक्ष रवींद्र भगत, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, भार्गव ठाकूर, डॉ. एस.टी. गडदे, स्वप्नील ठाकूर, अमोघ ठाकूर, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे मॅनेजर प्रदीप गोंधळी, चीफ रेफ्री शिवा यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. विविध वयोगटांमधील ही स्पर्धा 18 मेपर्यंत खेळली जाणार आहे.
Check Also
अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन् बोलके राहा!
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …
RamPrahar – The Panvel Daily Paper