Breaking News

पनवेलमध्ये मतदान उत्साहात

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मतदान केंद्रांना भेटी

पनवेल : रामप्रहर वृत्त
मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. 13) मतदान प्रक्रिया झाली. मावळ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत पनवेल विधानसभा क्षेत्रात भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी ठिकठिकाणी मतदान केंद्रांना भेटी दिल्या. या वेळी त्यांनी मतदारांसह कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले. त्यांनी कोपरा, खारघर, कामोठे, कळंबोलीमधील मतदान बूथ केंद्रांना भेट देऊन संवाद साधून आढावा घेत मतदान करण्याचे आवाहन केले.या वेळी भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, निलेश बावीस्कर, तेजस कांडपिळे, माजी नगरसेविका मोनीका महानवर, प्रमिला पाटील, संजना कदम, रूचिता लोंढे, अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष अजय कांडपिळे, रामा महानवर, समीर कदम, दिलीप बिस्ट, युवा नेते हॅप्पी सिंग, हरजींदर कौंर, भाजप युवा नेते शुभ पाटील, समीर मोरे, पंकज अष्टिकर, प्रकाश घोडेकर, पराग करले, गणेश नाईक, परेश कापसे, गौरव कांडपिळे आदी उपस्थित होते.

Check Also

गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Leave a Reply