Breaking News

फेडरर, नदाल उपांत्यपूर्व फेरीत

इंडियन वेल्स (अमेरिका) : वृत्तसंस्था

रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या दिग्गजांनी आपापल्या सामन्यात अपेक्षित विजय मिळवताना इंडियन वेल्स एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. यासह उपांत्य फेरीत हे दोन्ही दिग्गज एकमेकांविरुद्ध खेळण्याची शक्यता वाढली आहे.

जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानी असलेल्या स्पेनच्या नदालने पुन्हा एकदा एकतर्फी झालेल्या लढतीत बाजी मारताना सर्बियाच्या फिलिप क्रेजिनोविच याचा 6-3, 6-4 असा धुव्वा उडवला. सुरुवातीपासून आक्रमक खेळ केलेल्या नदालने एक तास 56 मिनिटांमध्ये फिलिपचे आव्हान संपुष्टात आणले.

दुसरीकडे तुफान फॉर्ममध्ये असलेल्या फेडररने आपला दर्जेदार खेळ सादर करताना ब्रिटनच्या कायले एडमंड याचा अवघ्या 64 मिनिटांमध्ये 6-1, 6-4 असा फडशा पाडला. फेडररच्या वेगवान आणि आक्रमक खेळापुढे एडमंडचा निभाव लागला नाही.

Check Also

निवडणुकीची हवा वाढतेय

राजकीय ’पिक्चर’ पाहूद्या की… प्रत्येक दिवसासोबत लोकसभा निवडणूक अधिकाधिक जवळ येत चाललीय, नवा रंग, रूप …

Leave a Reply