Breaking News

भाजप युवा मोर्चा पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या बुधवारी (दि. 15) करण्यात आल्या. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
पनवेल ग्रामीण युवा मोर्चा अंतर्गत प्रभाग 2च्या सरचिटणीसपदी करण फडके आणि उपाध्यक्षपदी समीर गोंधळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
या वेळी त्यांनी समीर गोंधळी आणि करण फडके यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच या वेळी करण फडके यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन अभीष्टचिंतन केले.
पनवेल शहरातील भाजपच्या तालुका आणि शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस दिनेश खानावकर, अ‍ॅड. चेतन भोईर, संजय गोंधळी आदी उपस्थित होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply