Breaking News

वाढदिवसानिमित्त माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

पनवेल : रामप्रहर वृत्त
हसतमुख स्वभाव, सर्वांना बरोबर घेऊन काम करणारे व्यक्तीमत्त्व, राजकारणापेक्षा समाजसेवेला महत्त्व देणारे, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक आदी क्षेत्रात कार्यरत राहून समाजात नावलौकिक प्राप्त करणारे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे शनिवारी (दि. 18) वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते हितचिंतकांनी अभीष्टचिंतन केले.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व कर्तव्यदक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांचा राजकीय व सामाजिक कर्तृत्वाचा वसा अंगी बाळगत विविध क्षेत्रांत यशाची अनेक शिखरे परेश ठाकूर यांनी पादाक्रांत केली आहेत. लोकनेते रामशेठ ठाकूर यांची दानशूरवत्ती, आमदार प्रशांत ठाकूर यांचे मार्गदर्शन परेश ठाकूर यांना नेहमी प्रेरक ठरले. तारुण्यातील सळसळता उत्साह समाजाच्या सेवेत खर्ची घालत त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवून दिली असून युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता रुजविण्यासाठी त्यांनी तरुणांची मजबूत फळी तयार केली आहे. युवकांचे आदर्श म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
युवा कार्यकर्ता ते पनवेल महापालिकेचे सभागह नेते म्हणून परेश ठाकूर यांनी जबाबदारीने काम करीत असताना जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अशा विविध संस्था-संघटना माध्यमातून राबविल्या जाणारे सामाजिक उपक्रम, मेळावे, पक्षबांधणी त्याचबरोबर विविध कार्यक्रमात परेश ठाकूर यांचे कार्य उल्लेखनीय असे आहे.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या वृत्तीमुळे परेश ठाकूर लोकप्रिय झाले. सामाजिक बांधिलकी आणि सर्वसामान्यांशी जोडली गेलेली नाळ हा त्यांचा आत्मा राहिला आहे. त्यामुळे अनेक संस्था, संघटना तसेच क्षेत्रांतील मान्यवर, हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त त्यांचे अभीष्टचिंतन करीत शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, शकुंतला ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिनेदार, नितीन पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, माजी जि.प.सदस्य अमित जाधव, माजी पं.स. सदस्य निलेश पाटील, राज पाटील, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, संजय भगत, दशरथ म्हात्रे, पनवेल शहर खजिनदार संजय जैन, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, समीर ठाकूर, नरेश ठाकूर, अमर पाटील, बबन मुकादम, अजय बहिरा, अमर ठाकूर, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, प्रिया मुकादम, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, अभिजित जाधव, सत्यवान जाधव, अ‍ॅड. चेतन जाधव, विशाल ठाकूर, दर्शन ठाकूर, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, योगेश लहाने, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, किशोर चौतमोल, प्रशांत कर्पे, युवा नेते हॅप्पी सिंग, उमेश पोद्दार, सांस्कृतिक सेलचे अभिषेक पटवर्धन, आप्पा भागीत, शिवाजी भगत, अविनाश गायकवाड, राजेश पाटील, प्रीतम म्हात्रे, केदार भगत, काका भगत, चिन्मय समेळ, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस.टी.गडदे, मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर, स्वप्नाली म्हात्रे, अमोघ ठाकूर, आदेश ठाकूर, आदित्य ठाकूर, अपूर्व ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन परेश ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Check Also

कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या निरंजन डावखरे यांचा अर्ज दाखल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने विद्यमान आमदार …

Leave a Reply