Breaking News

पनवेलमध्ये 262 नवे पॉझिटिव्ह

चौघांचा मृत्यू; 337 रुग्णांनी केली कोरोनावर यशस्वीपणे मात

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 19) कोरोनाचे 262 नवीन रुग्ण आढळले असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर 337 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 195 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 234 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 67 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू, तर 103 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.

नवीन पनवेल सेक्टर 13 ए टाइप चाळ नंबर 20 आणि पनवेल तक्का, मोराज रिव्हर साईड के-3 येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शनिवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 32 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2690 झाली आहे. कामोठ्यात 48 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3589 झाली आहे. खारघरमध्ये 40 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3343 झाली आहे.

नवीन पनवेलमध्ये 30 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3004 झाली आहे. पनवेलमध्ये 40 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2920 झाली आहे. तळोजामध्ये पाच नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 705 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 16,251 रुग्ण झाले असून 13,786 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.83 टक्के आहे. 2096 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 369 जणांचा मृत्यू झाला आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply