Breaking News

रामशेठ ठाकूर विद्यालयात मराठी दिनासह विज्ञान दिन उत्साहात साजरा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ज. भ. शि. प्र. संस्थेचे सचिव डॉ. गडदे यांनी केले. यात प्रामुख्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, संगणक, भूगोल इ. विषयांना अनुसरून विविध प्रकल्प बनविले होते. यात दोन्ही शाखेच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विज्ञान दिनाचे औचित्य साधून रांगोळी स्पर्धा आणि विज्ञान प्रश्नमंजुषेचे आयोजनही करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांसाठी विद्यालयाच्या प्राचार्या दुर्गा व पर्यवेक्षिका वीणा यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाकरिता संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरूणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. गडदे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

पनवेल ः जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी विद्यार्थ्यांनी एकपात्री नाटक स्पर्धेत सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या प्राचार्या दुर्गा व पर्यवेक्षिका वीणा यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाकरिता संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरूणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. गडदे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply