पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात 575 नव्या कोरोना रुग्णांची आणि 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद शनिवारी (दि. 19) झाली, तर दिवसभरात 731 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 262, अलिबाग 61, पेण 45, कर्जत 42, माणगाव 35, रोहा 33, महाड 21, खालापूर व पोलादपूर प्रत्येकी 18, सुधागड 12, उरण 10, श्रीवर्धन नऊ, मुरूड पाच आणि तळा व म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे; तर मयत रुग्ण पनवेल तालुक्यात चार, रोहा दोन आणि पेण, अलिबाग, श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यात प्रत्येकी एक असे आहेत.
नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 40978 व मृतांची संख्या 1094 झाली आहे. जिल्ह्यात 33,980 जण कोरोनामुक्त झाल्याने 5904 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!
‘वोटचोरी’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …
RamPrahar – The Panvel Daily Paper