Breaking News

वरिष्ठ पोलीस निरिक्षक रविंद्र दौंडकर यांचा सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती झालेले, वरिष्ठ पोलीस निरिक्षक रविंद्र रंगनाथ दौंडकर यांना त्यांच्या गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अत्यंत मानाचे असे राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झालेले आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल जिल्हा सरकारी अभियोक्ता भूषण साळवी यांनी त्यांचा आदरपुर्वक सत्कार केला.

सन 1995 मध्ये पो. उप. निरीक्षक पदावर सरळसेवेने भरती झालेले रविंद्र दौंडकर यांनी आजपर्यंत मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील वेगवेगळे पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेत काम केले आहे. अत्यंत क्लिष्ट व गंभीर गुन्ह्यांची उकल करुन त्यांनी अनेक आरोपी अटक केले आहेत. आजपर्यंतच्या सेवेमध्ये त्यांना 700 पेक्षा अधिक बक्षिसे व पोलीस महासंचालक पोलीस पदक आदी पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे.

या सत्काराच्या वेळी सहाय्यक सरकारी वकील राजेंद्र येरुणकर, वाय. एस. भोपी, आणि माधुरी थळकर उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply