पनवेल : रामप्रहर वृत्त
धनराज देविदास विसपुते यांची भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशाच्या शैक्षणिक संस्था प्रकोष्ठ सेलच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे भाजपकडून अभिनंदन करण्यात आले आहे. नवीन पनवेल येथील डी. डी. विसपुते महाविद्यालयाचे धनराज विसपुते अध्यक्ष आहेत. भारतीय जनता पक्षाच्या शैक्षणिक संस्था प्रकोष्ठ सेलच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. या वेळी शैक्षणिक संस्था प्रकोष्ठ सेलच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या उन्नतीसाठी अथक परिश्रम कराल, असा विश्वास पत्रातून व्यक्त करण्यात आला आहे.