Breaking News

प्लास्टिकमुक्तीसाठी श्रमदानाद्वारे स्वच्छता करा

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आवाहन

अलिबाग : प्रतिनिधी

’स्वच्छता हीच सेवा’ या मोहिमेच्या काळात विद्यार्थी, नागरिक व स्वयंसेवी संस्था यांनी शहरातील शक्य त्या ठिकाणी श्रमदानाद्वारे स्वच्छता करावी, जेणेकरून शहरातील प्रत्येक कानाकोपरा प्लास्टिकमुक्त झाल्याचे दृश्य पाहायला मिळू शकेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. ’स्वच्छता हीच सेवा’ ही मोहीम 11 सप्टेंबर ते 27 ऑक्टोबर या कालावधीत राबविली जात आहे. अलिबाग नगर परिषदेतर्फे शहरातील जुनी बाजारपेठ व अलिबाग समुद्रकिनारी आयोजित केलेल्या श्रमदान चळवळीप्रसंगी डॉ. सूर्यवंशी बोलत होते. या उपक्रमांतर्गत प्लास्टिक वस्तूंचा त्याग करून पर्यावरणाच्या रक्षणार्थ योगदान देण्याची शपथ जिल्हाधिकार्‍यांनी घेतली व विद्यार्थी, नागरिक, अधिकारी-कर्मचार्‍यांनाही शपथ दिली. उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र मठपती, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, तहसीलदार सचिन शेजाळ, नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश चौधरी यांच्यासह नागरिक, विद्यार्थी व विविध स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी नेहरू युवा केंद्रातर्फे प्लास्टिकमुक्तीवर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply