पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील नावडे येथे होत असलेल्या उड्डाणपुलासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी एमएमआरडीएचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यासोबत शुक्रवारी (दि. 12) पाहणी केली. या वेळी त्यांनी येथील नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी बैठक बोलाविण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले. नावडे येथील उड्डाणपुलामुळे नावडे गाव व नावडे फेज-2मधील नागरिकांना रस्ता ओलांडताना येणार्या अडचणी यापूर्वीही पाहणी करून लक्षात आणून देण्यात आल्या होत्या. या उड्डाणपुलामुळे ग्रामस्थांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यावर नव्याने आखणी करावी असे निर्देशसुद्धा दिले गेले होते. काही प्रमाणात त्यात सुधारणा करण्यात आली असून, नागरिकांच्या सूचना यात पूर्ण न झाल्याने पुन्हा त्यात सुधारणा करून योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी लवकरात लवकर बैठक बोलवावी, असे निर्देश आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी अधिकार्यांना दिले. या पाहणी दौर्यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, युवा नेते दिनेश खानावकर, विशाल खानावकर, प्रशांत खानावकर, मदन खानावकर, प्रितम म्हात्रे, जितू काटकर, राम खानावकर, राजेश पाटील, ज्ञानेश्वर पोरजी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.