Breaking News

मी उद्योजिका प्रदर्शनाचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

मोदीजींच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून महिला उद्योजिकांना ही प्रोत्साहन मिळावे या हेतूने ’गार्गीज ग्रुप’ आयोजीत ’मी उद्योजीका’च्या प्रदर्शनाचे उद्घाटन मोहिनी विक्रांत पाटील यांच्या हस्ते गोखले हॉल येथे झाले. गार्गीज ग्रुपच्या संयोजिका रश्मी मोरे यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना मोहिनी म्हणाल्या की, मी उद्योजिकाच्या मार्फत महिलांना एक चांगले व्यासपीठ मिळवून दिले आहे, की जिथे महिलांच्या कला आणि व्यावसायिक गुणांना वाव मिळणार आहे. पनवेलचे माजी उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांचे सुद्धा हेच स्वप्न आहे की आपण सर्वांनी आणि विशेष करून माता भगिनींनी आत्मनिर्भर व्हावे. मी उद्योजीकाच्या सर्व महिलांना आणि टीमला मोहिनी विक्रांत पाटील यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या उद्घाटनाच्या वेळी स्नेहल पाटील ढमाले यांची विशेष उपस्थिती होती. तसेच वसुधा सोलंकी, संजीवनी खिलारे, स्वाती पवार, प्रिया भोसले आदी उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply