ऋषिकेश शिंदेने सहा दिवसांत केले 1200 किलोमीटर अंतर पार
कडाव : प्रतिनिधी – कोरोना योद्ध्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी कडाव येथील ऋषिकेश शिंदे याने कर्जत ते गोवा हे 1200 किलोमीटर अंतर अवघ्या सहा दिवसांत पार केले.
कोरोना संक्रमण काळात पोलीस, प्रशासन व आरोग्य विभाग यांनी कौतुकास्पद काम केले. ऋषिकेश शिंदेने कर्जत ते गोवा प्रवासादरम्यान ठिकठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलीस व आरोग्य कर्मचार्यांना भेटून त्यांना प्रशस्तिपत्र देत कोरोना योद्ध्यांना अनोख्या पद्धतीने प्रोत्साहन दिले. ऋषिकेशने 20 ते 25 डिसेंबर या सहा दिवसांत कर्जत ते गोवा हा 1200 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला. सातारा, निपाणी, गोवा, कोल्हापूर अशा ठिकाणी त्याने मुक्काम करीत हा प्रवास पूर्ण केला. प्रवासात सहकारी म्हणून अनिकेत जाधव, राकेश शिंदे, सोहेल मुकादम, स्वप्निल जगताप त्याच्या बरोबर होते. त्याला एक्सपोर 13 सायकल, कर्जत येथील सायकलप्रेमी ग्रुप, पोलीस ठाणे, तहसील कार्यालय आणि अनेक सहकार्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.