Breaking News

ग्रामपंचायत निवडणूक : कर्जत तालुक्यात सदस्यपदाच्या 89 जागांसाठी 297 उमेदवारी अर्ज

कर्जत : प्रतिनिधी – तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झाला असून  त्यानुसार बुधवारी (दि, 30) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.  तोपर्यंत ग्रामपंचायत सदस्य पदाच्या एकूण 89 जागांसाठी 297 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून हुमगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.

कर्जत तालुक्यात कोल्हारे, जिते, पोशीर, साळोख तर्फे वरेडी, हुमगाव, कडाव, वैजनाथ, भिवपुरी, आणि दामत या नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. बुधवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत कोल्हारे ग्रामपंचायतीमधील सदस्य पदाच्या 11 जागांसाठी 44, जिते ग्रामपंचायतीच्या 7 जागांसाठी 26, पोशीर ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी 35, साळोख तर्फे वरेडी ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी 46, हुमगाव ग्रामपंचायतीच्या 7 जागांसाठी 6, कडाव ग्रामपंचायतीच्या 13 जागांसाठी 35, वैजनाथ ग्रामपंचायतीच्या 9 जागांसाठी 34, भिवपुरी ग्रामपंचायतीच्या 7 जागांसाठी 19, आणि दामत ग्रामपंचायतीच्या 13 जागांसाठी सर्वाधिक म्हणजे 52 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत निवडणूकीसाठी एकूण 297 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी दिली आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply