सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन
पनवेल : रामप्रहर वृत्त : पनवेल व नवी मुंबई परिसरात येणारे विमानतळ, सिडकोचा विकसित होत जाणारा नैना प्रकल्प यामुळे नवी मुंबई व पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उद्योग-धंदे निर्माण होत आहेत, या संधीचा फायदा घेत, तरुणांनी उद्योग-धंद्याचे प्रशिक्षण घेऊन उद्योजक बना, नोकरी मागणारे नाही, तर नोकरी देणारे बना, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले, अल्ट्रास्टिक फाऊंडेशन आयोजित उद्योजक मेळाव्यात ते बोलत होते.
अल्ट्रास्टिक फाऊंडेशन ट्रस्ट आणि भारती विद्यापीठ मॅनेजमेंट कॉलेज यांच्या संयुक्त विद्यामाने नवी मुंबई व पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील उद्योजकांनी एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य करीत आपले उद्योग-धंदे वाढवावेत व नवीन उद्योजकांना त्या संबंधितच प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळावे यासाठी एका बिझनेस क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या अल्ट्रास्टिक बिझनेस कल्बचे उद्घाटन शनिवारी (दि. 4) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अनिल अंबानी गु्रपचे एचआर हेड अतुप गुप्ता, भारती विद्यापीठ मॅनेजमेंट कॉलेजच्या संचालिका डॉ. अंजली कळसे, बिझनेस कोच डॉ. संतोष कामरेकर, उद्योजक ब्रिजेश मिश्रा यांच्या सह 68 उद्योजक उपस्थित होते.
लवकरच अधिक आकर्षक स्वरूपात आणि उद्योजकांसाठी विविध योजना घेऊन बिझनेस गु्रप सुरू होत आहे. ज्यांना या बिझनेस गु्रपचे सदस्य व्हायचे असेल त्यांनी अल्ट्रास्टिक फाऊंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष विजय चव्हाण 9322280682 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.