Breaking News

बौद्धाचार्य श्रामणेर प्रशिक्षण शिबिरास मोहोपाड्यात प्रतिसाद

मोहोपाडा : प्रतिनिधी

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य श्रामणेर प्रशिक्षण शिबिर मोहोपाडा (रसायनी) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात पनवेल तालुका अध्यक्ष राम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आले आहे. या श्रामणेर प्रशिक्षण शिबिरात राष्ट्रीय सचिव एम. डी. सरोदे गुरुजी मार्गदर्शन करीत आहेत. या वेळी राज्यभरातून उपस्थित राहिलेल्या भन्ते शिवली बोधी यांना शिबिरात प्रशिक्षण दिले जात आहे. यात एकूण 40 प्रकारच्या विषयांवर प्रशिक्षण दिले जाते. यात मानवाच्या कल्याण, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, सद्वर्तन आदी विषयांवर मार्गदर्शन सुरू आहे, तसेच या श्रामणेर प्रशिक्षण शिबिरात शनिवार (दि. 9) व रविवारी (दि. 10) समता सैनिक दलाचे प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष मेजर विजय कांबळे यांनी सखोल मार्गदर्शन केले. या शिबिरात प्रामुख्याने शारीरिक, कवायत व मानसिक व्यायाम यामधून समतावादी समाजनिर्माणतेचा पाया यावर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी मेजर अनंता गायकवाड यांनी मार्गदर्शन करून सहकार्य केले. तालुका अध्यक्ष राम जाधव, सरचिटणीस राहुल कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश कलोते आदींच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. यासाठी भारतीय बौद्ध महासभेची जिल्हा कार्यकारिणी व जिल्ह्यातील पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, बौद्धाचार्य, श्रामणेर, समता सैनिक, उपासक, उपासिका परीश्रम घेत आहेत. या प्रशिक्षण शिबिराची सांगता आद. भीमराव आंबेडकर (राष्ट्रीय कार्याध्यक्ष) यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 13) होणार आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply