Breaking News

पनवेल महापालिकेनेही थुंकणार्यांकडून दंड घेणे गरजेचे

पनवेल : प्रतिनिधी : राज्यात संचारबंदी लागू असताना देखील नागरिक बाहेर पडत असल्याने याचा परिणाम भयंकर होऊ शकतो याची जाणीव अद्याप नागरिकांना होत नसल्याने पोलिसांना आता रस्त्यावर भटकणार्‍यांवर चोप देण्याची वेळ आलेली आहे. या वेळी रस्त्यावर थुंकलेल्या रिक्षावाल्याला पोलिसांनी रस्ता साफ करायला लावून अद्दल घडवली. मुंबई महापालिकेप्रमाणे आता पनवेल महापालिकेनेही थुंकणार्‍यांना दंड करणे गरजेचे आहे.   

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी मंगळवारी (दि. 24) देशात 21 दिवस लॉकडाऊन घोषित केला. पण नागरिकांनी ते फारसे मनावर घेतलेले दिसत नाही. अनेक ठिकाणी नागरिक बाहेर फिरताना दिसत आहेत. गल्ली बोळात अनेक ग्रुप एकत्र येऊन बसलेले दिसतात. अनेकजण आपल्या बरोबर लहान मुलांना घेऊन बिनधास्त फिरताना दिसत आहेत. खांदेश्वर पोलिसांची गाडी नागरिकांना रस्त्यावर येऊ नका म्हणून आवाहन करीत फिरत असते पण त्याचा परिणाम फारसा दिसत नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.   

पोलीस बंदोबस्तासाठी फिरत असताना एक रिक्षावाला आपल्या रिक्षातून गुटका खाऊन रस्त्यावर थुंकला असता पोलिसांनी त्याला खाली उतरवून रस्त्यावर पाणी ओतून फडक्याने त्याला रस्ता साफ करायला लावून त्याला चांगली अद्दल घडवली. अशा गुटका खाऊन थुकण्याची सवय असलेल्यामुळे ही कोरोनाचे संक्रमण होऊ शकते याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. मुंबई महापालिकेने रस्त्यावर थुंकणार्‍यांना दहा हजार दंड ठेवला आहे. त्याप्रमाणे पनवेल महापालिकेनेही थुंकणार्‍यांना दंड करणे गरजेचे आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply