विनम्र अभिवादन
कामोठे : रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल सीबीएसई बोर्ड यांच्या वतीने माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे, लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल सीबीएसई बोर्डच्या प्राचार्य प्रीती दास, पीआरओ बाळासाहेब कारंडे उपस्थित होते.