पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर गावात सरकारी नोकरी, पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास परिसरातील युवक, युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सिद्धेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावे व वाड्यांवरील मुले आणि मुलींसाठी येथील प्राथमिक शाळेत भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या वेळी गावातील सैन्य दलात कार्यरत असलेले अंकेश पोंगडे, ग्रामसेवक ए. टी.गोरड, पोलीस कर्मचारी एल. डी. अलदर, प्राइड इंडियाचे मोरे यांनी मार्गदर्शन केले.
सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दिलेली स्पर्धा परीक्षेची पुस्तके दिली उपस्थित मुलामुलींना अभ्यासण्यास देण्यात आली. तसेच या विषयावर पुढे सातत्याने अभ्यास वर्ग, स्पर्धा आयोजित करून मुलांची मानसिक आणि शारीरिक तयारी करून घेण्याचा निर्धार ग्रामपंचायत आणि शिक्षकांनी या वेळी केला. या शिबिरासाठी स्वदेस फाऊंडेशन, प्राइड इंडिया, शिक्षक रमाकांत शिंदे व लक्ष्मण चव्हाण आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहकार्य केले.
सरपंच उमेश यादव, उपसरपंच योगेश सुरावकर, सदस्य नथुराम चोराघे, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष आशिष पोंगड, गणेश यादव, कृष्णा वाघमारे, अनंता साळसकर, आशिष यादव, मुख्याध्यापक बजरंग बेलोसे, स्मिता मराठे, रोहिणी खामकर व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.