Breaking News

माणगावात ग्रा.पं. निवडणुकीचे मतदान शांततेत

माणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील लोणेरे ग्रामपंचायतीमधील सदस्य पदाच्या आठ तर बामणोली ग्रामपंचायतीतील तीन जागांसाठी शुक्रवारी (दि.15) उत्स्फूर्तपणे व शांततेत मतदान झाले. या वेळी  कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मत मोजणी सोमवारी (दि.18) माणगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.

माणगाव तालुक्यातील टेमपाले, लाखपाले, देवळी, लोणेरे, बामणोली या पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी टेमपाले, लाखपाले, देवळी या तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका  बिनविरोध झाल्या असून लोणेरे ग्रामपंचायतीत तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून उर्वरित आठ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. तर बामणोली ग्रामपंचायतीत सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित तीन जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (आय) अशी महाविकास आघाडीची सत्ता असतानाही ग्रामपंचायत निवडणूकीत या आघाडीमध्ये बिघाडीच झालेली दिसून येते.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply