Breaking News

वीकेण्ड लॉकडाऊनमुळे रायगडात शुकशुकाट

पेणमध्ये खवय्यांची झाली पंचाईत

पेण : प्रतिनिधी

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने प्रशासनाने वीकेण्ड लॉकडाऊन अधिक कडक केला आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने बंद ठेवत, त्यांना केवळ होम डिलीव्हरीवर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मेडिकल स्टोअर्समधील कर्मचार्‍यांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. जेणेकरुन कोरोना विषणूंची साखळी तोडून रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

पेणमध्ये रविवारी सकाळपासून कडक निर्बंध लावल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता. सकाळीच पोलिसांनी मटण, चिकन विक्रीची दुकाने बंद केल्याने खवय्यांचा मात्र हिरमोड झाला. तालुक्यातही कडक निर्बंधांचे पालन करण्यात आले.

पेण शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, विनाकारण फिरणार्‍या वाहनचालकांवर तसेच नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.

रोह्यातील रस्त्यांवर सामसूम

रोहे ः प्रतिनिधी

वीकेण्ड लॉकडाऊनचे रविवारी रोह्यात काटकोरपणे   पालन करण्यात आले. शहारातील दुध डेअरी व काही ठरविक मेडिकल स्टोअर्स वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. शहरासह तालुक्याच्या ग्रामीण  भागातही वीकेण्ड लॉकडाऊनचे पालन करण्यात आले.

रोहा बाजारपेठ रविवारी पुर्णपणे मोकळी होती.किराना, कांदा, बटाटा, भाजी, फळ ही सर्व प्रकारची दुकाने बंद होती. दुध डेअरी यांनासुध्दा वेळेच्या मर्यादा घालण्यात आल्या होत्या. नेहमी गजबजणारे रस्ते आज मोकळे दिसत होते. शहरात पोलिसांची गस्त सुरू होती. निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रोहा शहराच्या प्रवेशव्दारासमोर नाकाबंदी केली होती. येणार्‍या जाणार्‍या व्यक्ती तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात येत होती.

सुधागडातील बाजारपेठा सुन्यासुन्या

पाली : प्रतिनिधी

वीकेण्ड लॉकडाऊनच्या पहिल्या व दुसर्‍या दिवशी शनिवार व रविवारी सुधागड तालुक्यातील पाली, पेडली, परळी व जांभूळपाडा या बाजारपेठा व अन्य गावातील लोकांनी कडकडीत बंद पाळला. येथील मुख्य बाजार पेठांत जीवनावश्यक वस्तूची आस्थापने वगळता बाकी आस्थापने बंद होती. एरव्ही गजबजलेल्या मुख्य  बाजारपेठा रविवारी सुमसूम झाल्या होत्या. चौका चौकात महत्वाच्या ठिकाणी पोलीस तैनात असून, ते अक्शॅन मोडमध्ये असल्याचे दिसून आले. मास्क न लावणारे, विनाकारण फिरणार्‍यांवर पोलीस कारवाई करत असल्याने नागरिकांनी धसका घेतल्याचे दिसते. एसटी वाहतूकदेखील ठप्प झालेली पाहायला मिळाली. वीकेण्ड लॉकडाऊनप्रमाणेच जनतेने इतर दिवशीही खबरदारी घ्यावी, शासन नियम पाळावेत, विनाकारण घराबाहेर पडू नये, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. यापूर्वी कोरोनाला हद्दपार करण्यात आपण यशस्वी ठरलो होतो, आता पुन्हा कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी केले.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply