नवी मुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्यात एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 14) घडली. भूषण पवार असे आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकार्याचे नाव असून, त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. भूषण पवार रविवारी सकाळी एपीएमसी पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी झाडली. त्यांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सूत्रांच्या माहितीनुसार पवार हे गेल्या काही दिवसांपासून ते तणावात होते. पोलीस या आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा शोध घेत आहे.