मुंबई : राज्यातील महाविद्यालये सोमवार (दि. 15)पासून सुरू होणार आहेत, मात्र मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालये सध्या सुरू होणार नाहीत. मुंबईतील महाविद्यालये सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन विचार होणार आहे. महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय जरी राज्य सरकारने दिला असला तरी स्थानिक प्रशासन यावर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय देणार आहे, असे शासन निर्णयात नमूद आहे. मुंबई विद्यापीठांतर्गत येणार्या वसई, विरार, पालघर, पनवेल या क्षेत्रात स्थानिक प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर राज्य शासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन करीत महाविद्यालये सोमवारी सुरू होणार आहेत, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातील स्थानिक प्रशासनाने अद्याप महाविद्यालये सुरू करण्याबाबत कळवले नसल्याची माहिती आहे.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …