कामोठे : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक 13 तर्फे ‘उत्सव हळदी कुंकुवाचा सन्मान नारी अस्मितेचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे पल्लवी हर्षवर्धन पाटील यांनी आयोजन केले होते. या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळांचा आयोजन करण्यात आले असून, विजेत्यांना आकर्षीत बक्षीसे भेट देण्यात आली. हा कार्यक्रम कामोठे सेक्टर 18 येथे आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमास कामोठे पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता जाधव, नगरसेविका कुसुम म्हात्रे, हेमलता गोवारी, पुष्पा कूत्तरवडे, अरुणा भगत, भाजप महिला मोर्चा जिल्हा सचिव अॅड. आशा भगत, हरजिंदर कौर, नीलम आंधळे, विजया कदम, जयश्री धापते, वैशाली जगदाळे, दीपाली तिवारी, मनीषा वणवे, ललिता इनकर, दीक्षा जगताप, मीरा मोरे, नंदा गडवे, सुनीता शर्मा, लता गोड्गे, फातिमा शेख यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी सुरेखा लांडे, कल्पना जाधव आणि जयश्री गोड्गे यांनी विशेष मेहनत घेतली.