पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने बुधवारी (दि. 17) नवीन पनवेल येथील साई आश्रय वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना फळे व बिस्कीट वाटप करण्यात आले. दरम्यान, वृद्धश्रमातील आजीचा वाढदिवसदेखील केक कापून साजरा करण्यात आला. वृद्धाश्रमातील ज्येष्ठांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करून लोकनेते रामशेठ ठाकूर यांना भरभरून आशीर्वाद दिले. या कार्यक्रमास राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडीक, रयत राजाचे संस्थापक बलराम बडेकर, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, विजय दुंद्रेकर, सुरेश भोईर, ओमकार महाडिक, साई आश्रय वृद्धश्रमाचे किरण पाटील, ज्योती पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.