Breaking News

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी निलेश सोनावणे

पनवेल : वार्ताहर

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या सन 2021-2022करिता साप्ताहिक पनवेल युवाचे संपादक निलेश सोनावणे यांची दुसर्‍यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. समितीच्या बुधवारी (दि. 17) झालेल्या मासिक बैठकीत समितीचे ज्येष्ठ सदस्य तथा सल्लागार माधव पाटील यांच्या सूचनेनुसार नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नव्या कार्यकारिणीत सरचिटणीचपदी सा. माझं पनवेलचे संपादक विशाल सावंत, कार्याध्यक्षपदी दिशा चॅनलचे संपादक सुनील कटेकर, उपाध्यक्षपदी सा. रायगड पनवेलचे संपादक संतोष भगत, खजिनदारपदी दै. ‘रामप्रहर’चे हरेश साठे, सहचिटणीचपदी वचन गायकवाड, प्रसिद्धीप्रमुखपदी संतोष सुतार, सल्लागारपदी सिटी बेलचे संपादक विवेक पाटील यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे सदस्यपदी सा. वतन कर्नाळाचे संपादक भालचंद्र जुमलेदार, सिटी बेलचे समूह संपादक मंदार दोंदे, दै. नवराष्ट्रचे प्रतिनिधी राजेंद्र कांबळे, साईश्रद्धा न्यूज नेटवर्कचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत ठाकूर, मल्हार चॅनेलचे प्रतिनिधी प्रवीण मोहकर, दै. पुढारीचे प्रतिनिधी रवींद्र गायकवाड यांची सदस्यपदी निवड झाली आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply