पनवेल : रामप्रहर वृत्त
राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेल-रायगड यांच्या वतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70 व्या वाढदिवासानिमित्त 70 आयोजित कार्यक्रमांतर्गत रविवारी (दि. 28) पनवेल तालुक्यातील बोंडारपाडा याठिकाणी अन्नदान करण्यात आले.
या उपक्रमावेळी सरपंच रंजनी गोमा ढुमणे, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, गोमा ढुमणे, भारत ढुमणे, रमेश भगत, ओमकार महाडिक, सदाशिव मोरे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. फेब्रुवारी महिन्यात एकूण नऊ उपक्रम राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने राबविण्यात आले आहेत.