Breaking News

खंडाळा घाटात अनियंत्रित कारची दुचाकीला धडक

खोपोली : प्रतिनिधी

खंडाळा घाटातून खोपोलीकडे येत असलेली कार सायमाळ पुढील पोलीस चौकी उतारावर अनियंत्रित झाली. अनियंत्रित कारने एका दुचाकीला धडक दिली. झालेल्या अपघातात कार सुरक्षा कठडा तोडून रस्त्यावरून खाली गेल्याने कारचे मोठे नुकसान झाले. अपघातातील तिन्ही जखमींना खोपोली येथील रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले.

यात दुचाकीवरील एक व कारमधील दोन असे तीन जण जखमी झाले आहेत. यात दोन महाविद्यालयीन मुलींचा समावेश आहे. सुदैवाने ही अनियंत्रित कार सुरक्षा कठड्यावर आदळली. त्यामुळे थांबली व पुढील 100 फूट दरीत कोसळण्याचा दुर्दैवी घटना टळली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply