श्रीवर्धन ़: प्रतिनिधी
विधानसभेच्या श्रीवर्धन मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांच्याकडे 23 नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली आहेत. विनोद रामचंद्र घोसाळकर (महायुती), आदिती सुनील तटकरे (काँग्रेस आघाडी), सुमन यशवंत सकपाळ (बहुजन समाज पक्ष), अकमल असलम कादीरी (इंडियन युनियन मुस्लिम लीग), रामभाऊ रामचंद्र मंचेकर (बहुजन मुक्ती पार्टी), संजय बाळकृष्ण गायकवाड (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यांच्यासह ज्ञानदेव मारुती पवार, संतोष तानाजी पवार, शेख मुईज अ. अजिज, भास्कर नारायण कारे, अकमल असलम कादीरी, विनेश विजय घोसाळकर, हेमंत यशवंत देशमुख, महेक फैसल पोपेरे, गीता भद्रसेन वाढई, दानिश नईम लांबे, देवचंद्र धर्मा म्हात्रे यांनी अपक्ष म्हणून श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.