Breaking News

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात अभिमुखता कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोना महामारीचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी अभिमुखता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रभारी प्राचार्य डॉ. संजय मराठे यांच्या हस्ते झाले. या वेळी आयक्यूएसीचे समन्वयक प्रा. प्रवीण महेश्वरी झिरपे, एनएसएस विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण सावे, डीएलएलई विभागप्रमुख प्रा. महेश धायगुडे, सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी प्रा. नमिता सिन्हा अखौरी व त्याचे सहकारी उपस्थित होते.

या अभिमुखता कार्यक्रमात प्रा. प्रियंका पांडे यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध सुविधांची, तसेच महाविद्यालयातील विभागांची माहिती दिली. त्याचबरोबर परीक्षा विभागप्रमुख प्रा. रश्मी पाटील यांनी परीक्षा पद्धती आणि सत्राबद्दल विशेष माहिती दिली. महाविद्यालयात आयोजित करण्यात येणार्‍या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती प्रा. नमिता सिन्हा अखौरी यांनी दिली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष व्यवस्था करून कोरोना नियमांचे पालन करण्यात आले. या वेळी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्तम प्रतिसाद दिला, तसेच प्रा. रंजना राना, प्रा. राहुल कांबळे, प्रा. मीनल मांडवे, प्रा. मानसी शाहा, प्रा. मीरा जैन, प्रा. प्रियंका पांडे आदींसह शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

या विशेष अभिमुखता कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply