कर्जत : बातमीदार
भाजप महिला मोर्चा कर्जत मंडळाच्या वतीने शेलू येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बचत गट यशस्वीपणे चालवणार्या महिलांचा सत्कार करण्यात आला, तसेच कोरोना काळात चांगले काम करणार्या महिला डॉक्टर्स, पोलीस, शिक्षिका यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुण्या वृषाली वैद्य यांनी महिला सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले.
भाजप महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील, जिल्हा सरचिटणीस मृणाल खेडकर, जिल्हा चिटणीस बिनिता घुमरे, कार्यकारणी सदस्या स्मिता मोडक, कर्जत तालुका अध्यक्षा स्नेहा गोगटे, तालुका उपाध्यक्षा अर्चना फोपे, सुनिता गुरव, सरचिटणीस वर्षा बोराडे, तालुका कार्यकारणी सदस्या स्वप्ना सोहोनी, रसिका म्हसे, भावना ऐनकर, शहर अध्यक्षा सरस्वती चौधरी, उपाध्यक्षा मनीषा अथनिकर, गीतांजली देशमुख, नेरळ शहर अध्यक्षा नम्रता कंदळगावकर, उपाध्यक्षा मानसी खेडेकर, कोकण सोशल मीडिया संपर्क प्रमुख गायत्री परांजपे, माजी तालुका अध्यक्षा सुगंधा भोसले, नगरसेविका स्वामींनी मांजरे, तसेच नीता कवाडकर, वाकस ग्रामपंचायत उपसरपंच रंजना भागीत यांच्यासह महिला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कर्जत पंचायत समिती सदस्य नरेश मसने आणि भाजप युवा मोर्चाचे रवींद्र मसने यांनी पुढाकार घेऊन महिला मोर्चाकडून हा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, तालुका सरचिटणीस राजेश भगत, किसान मोर्चा कोकण संपर्क प्रमुख सुनिल गोगटे, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संतोष भोईर, जीवन मोडक, राहुल कुलकर्णी आणि भाजपचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.