Breaking News

कर्जत रेल्वेस्थानकात जागतिक महिला दिन उत्साहात

कर्जत : बातमीदार

रेल्वे पॅसेंजर असोसिएशन, रेल्वे पोलीस आणि आरपीएफ जवान यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत रेल्वे स्थानकात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

नगराध्यक्ष सुवर्णाचे जोशी, असोसिएशनच्या सदस्या कल्पना दास्ताने, शर्वरी  कांबळे, बिनिता घुमरे, सुषमा ढाकणे, मनिषा अथणीकर यांच्यासह आरपीएफ पोलीस रुपाली मोहिते, माधुरी खंडागळे यांनी या वेळी महिलांच्या विविध विषयांवर चर्चा व

मार्गदर्शन केले.

कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक मनोजकुमार माने, प्रेरणा भालेराव घोडके, शिरीन हुसेन यांनी आपले अनुभव कथन केले. या कार्यक्रमास ज्योती सरोदे, शुभांगी देशमुख, वैशाली घुर्वे, दिपाली सुतार, सोनाली माने, गीता तांडेल, साक्षी दिघे, साभिया चौगुले, पुजा पेडणेकर, आशा मुकणे, माधुरी खंडागळे, रेखा गायकवाड, मोहिणी जाधव, विमल गायकवाड, विद्या भालेराव, सुजाता गवळे, काजळ डोंगरे, आरपीएफचे अनिल वर्मा, प्रकाश कदम, राजेंद्र सोमवंशी  यांच्यासह कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे कार्याध्यक्ष सुरेश खानविलकर, सचिव प्रभाकर गंगावणे, खजिनदार विनोद पांडे, शिवसेवक गुप्ता उपस्थित होते.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply