मुरुड : प्रतिनिधी
येथील ग्रामीण रूग्णालयात गुरुवार (दि. 1) पासून 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देण्यास सुरूवात करण्यात आली. डॉ. दिव्या सोनम, डॉ. शिवाली व्हावळ, ओमकार कोरमवार, निर्मला भोसले उपस्थित होत्या.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर एका महिन्याच्या अंतराने संबंधिताला दुसरी लस दिली जाणार आहे. देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू झाली. त्यात आरोग्य कर्मचारी आणि वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर 1 मार्चला या लसीकरण मोहिमेच्या दुसर्या टप्प्याला सुरुवात झाली. त्यात 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 ते 59 वयोगटातील इतर आजार असलेल्यांना लस दिली जात होती. मुरूडमध्ये आतापर्यत 60 वर्षावरील 483 नागरिकांनी या लसीचा लाभ घेतला आहे.
कोविड विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावे. -गमन गावित, तहसीलदार, मुरूड