Breaking News

विसर्जन घाटावर भाविकांचे भक्तिभावाने स्वागत

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

शनिवारी (दि. 7) सगळीकडे पाच दिवसांच्या गणपतीचे भक्तिभावाने विसर्जन झाले. नवीन पनवेल सुकापूर येथील तलावातही परिसरातील अनेक गणपतींचे विसर्जन झाले. या वेळी उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळ नवीन पनवेल, तसेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने गणपती विसर्जन घाटावर भाविकांचे स्वागत करण्यात आले. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पनवेल सुकापूर येथील गणपती विसर्जन घाटावर येणार्‍या भाविक भक्तांचे श्रीफळ देऊन नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी भक्तिभावाने स्वागत केले. तसेच लहान मुलांना बिस्कीट पुड्यांचे वाटप केले. या वेळी त्यांच्यासोबत प्रशांत फुलपगार, अनंत जाधव, राकेश भुजबळ, अजित लोंढे, क्रांती चितळे, किशोर शिंदे, बेंजामिन खराडे, दिलीप गोरे, विजय भुजबळ, विलास भगत, यश भुजबळ, सिद्धेश भुजबळ, अ‍ॅड. संकेत डोके, पप्पू साळवे, अशोक गुंजाळ, दांमन्ना साखरे, प्रवीण कांबळे, कनय्या कांबळे, जितू घटविसावे, रवी मगर, योगेश आखाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply