Monday , January 30 2023
Breaking News

महिला सुरक्षेसाठी 195 कोटींचा निधी

महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांची माहिती

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

महिला सुरक्षेच्या केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला 195 कोटी 54 लाख 30 हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या वतीने देशातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी चालविण्यात येणार्‍या निर्भयाफंड, वनस्टॉप सेंटर, महिला हेल्पलाईन या योजनांसाठी राज्य व केंद्रशासीत प्रदेशांना निधी वितरीत करण्यात आला आहे.  महिला सुरक्षेसाठी केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या वतीने ‘निर्भया फंड’ तयार करण्यात आला असून देशातील राज्य व केंद्रशासीत प्रदेशांना याअंतर्गत निधी वितरीत करण्यात आला आहे. महाराष्ट्राला ‘निर्भया फंड’ अंतर्गत एकूण 149 कोटी 40 लाख सहा हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. याच कार्यक्रमांतर्गत राज्याच्या विधी व न्याय विभागाला 31 कोटी 5 लाखांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. केंद्रीय महिला व बाल कल्याण  मंत्री स्मृती इराणी  यांनी गुरुवारी (दि.12) राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही  माहिती दिली.

महिलांसाठी देशभर वन स्टॉप सेंटर

अडचणीत सापडलेल्या महिलांना तत्काळ मदत पोचविण्यासाठी देशभर ‘वन स्टॉप सेंटर’ उभारण्यात आले आहेत, महाराष्ट्रात असे सेंटर उभारण्यासाठी 14 कोटी 46 लाख 54 हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच अडचणीत सापडलेल्या महिलांना तत्काळ संपर्क करता यावा म्हणून सुरु करण्यात आलेल्या ‘महिला हेल्पलाईनचे’ सार्वत्रीकरण करण्यासाठी महाराष्ट्राला 62 लाख 70 हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply