चेन्नई ः वृत्तसंस्था
आयपीएलसाठी खेळाडूंप्रमाणेच चाहतेदेखील उत्सुक आहे. या वर्षी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाला एक नवा चाहता मिळाला आहे. जगातील सर्वांत वेगवान धावपटू जमैकाचा माजी खेळाडू उसेन बोल्टने या वर्षी विराटच्या नेतृत्वाखाली खेळणार्या संघाला पाठिंबा देण्याचे ठरवले आहे.
बोल्टने आरसीबीची जर्सी घातलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. पहिल्या लढती आधी बोल्टने विराटच्या संघाला बुस्टर दिला आहे. या फोटोत बोल्टने विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांना टॅग केले आहे. तो म्हणतो, चॅलेंजर्स, मी तुम्हाला इतकेच सांगू इच्छितो की, मी आजदेखील सर्वांत वेगवान धावपटू आहे.
बोल्टच्या या ट्विटवर विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे. ‘यात कोणतीही शंका नाही. यामुळेच आम्ही तुला आमच्या संघात घेतले आहे,’ असे विराटने म्हटले आहे.
डिव्हिलियर्सदेखील बोल्टच्या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्हाला जेव्हा अतिरिक्त धावांची गरज असेल तेव्हा कोणाला बोलवायचे हे माहीत आहे,’ असे त्याने म्हटले आहे.
आयपीएलच्या 14व्या हंगामाला शुक्रवार (दि. 9)पासून सुरुवात होत आहे. स्पर्धेतील पहिली लढत गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होत आहे. आरसीबीला अद्याप एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळवला आले नाही. या वर्षी विराट आणि आरसीबीचा प्रयत्न पहिल्या विजेतेपदासाठी असेल. यंदा आरसीबीने ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याला संघात घेतले आहे. याशिवाय संघात सलामीवीर देवदत्त पडिक्कलदेखील आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …