Breaking News

आताची शिवसेना ही बाळासाहेबांची राहिलेली नाही

औरंगाबादच्या नामांतरावरून मनसेने लगावला टोला

मुंबई : प्रतिनिधी
औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या राजकारणात आता महाराष्ट्र नवननिर्माण सेनेनेही उडी घेतली आहे. शिवसेनेने औरंगाबादचे नामांतर करण्याबाबत चाचपणी सुरू केल्यानंतर काँग्रेसकडून त्याला थेट विरोध करण्यात आला आहे. त्यावरून मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपने शिवसेनेला लक्ष्य केले होते. आता मनसेनेही शिवसेनेची कोंडी केली आहे.
औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेला घेरताना मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, सत्ता महत्त्वाची की मराठी अस्मिता महत्त्वाची हे शिवसेनेने ठरवावे. आताची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. त्यामुळे ते केवळ अग्रलेख लिहीत आहेत. अग्रलेख लिहीत बसण्यापेक्षा औरंगाबादचे नामांतर करायचे तर लवकर करा. पुढे देशपांडे यांनी 26 जानेवारीपर्यंत औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करा. तसे न झाल्यास तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असेही म्हटले आहे.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply