Breaking News

भारतीय हॉकी संघाची सरावात अर्जेंटिनावर मात

ब्युनॉस आयर्स ः वृत्तसंस्था
भारतीय पुरुष हॉकी संघाने विद्यमान ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनाचा 4-3 असा पराभव करीत अर्जेंटिना हॉकी दौर्‍यातील पहिल्या सराव सामन्यात आश्वासक सुरुवात केली.
या सामन्यात भारताकडून निळकंठ शर्मा (16व्या मिनिटाला), हरमनप्रीत सिंग (28व्या मिनिटाला), रुपिंदरपाल सिंग (33व्या मिनिटाला) आणि वरुण कुमार (47व्या मिनिटाला) यांनी गोल करीत विजयात योगदान दिले. लिआंड्रो टोलिनी (35व्या आणि 53व्या मिनिटाला) आणि मायको कॅसेला (41व्या मिनिटाला) यांनी यजमानांसाठी गोल केले.
या विजयावर प्रतिक्रिया देताना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड म्हणाले की, ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनाविरुद्ध विजय मिळवणे ही खूपच चांगली बाब असून, या विजयामुळे आमचा आत्मविश्वास उंचावला आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply