Breaking News

कोरोना, टाळेबंदी आणि मानसिक आरोग्य

भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण गतवर्षी 30 जानेवारीला आढळला. त्यानंतर मार्चच्या अखेरीस आपल्याकडे टाळेबंदीला सुरुवात झाली, पण मधल्या दोन महिन्यात सगळ्यांनी काय अनुभवलं? तर एका टोकाला होती बेफिकिरी, अतिविश्वास आणि अहंभाव तर दुसर्‍या टोकाला भीती, टोकाची चिंता आणि संताप. आपल्याकडे कोणतीही समस्या येवो, शारीरिक आरोग्यालाही जिथे फारच कमी महत्व दिलं जातं, तिथे मानसिक आरोग्याची काय कथा? आपल्याकडे एकूण आरोग्यासाठी असलेले बजेट जीडीपी (ॠऊझ)च्या 1.6 टक्के इतकंच म्हणजे फारच कमी आहे, त्यात मानसिक आरोग्यासाठी 1 टक्क्यापेक्षाही कमी बजेट आहे. 2019 च्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (थकज) अहवालानुसार भारतात 20 कोटी लोकांना प्रत्यक्ष मानसिक आरोग्याच्या सुविधांची आवश्यकता आहे आणि नैराश्यग्रस्त व्यक्ती असलेल्या देशांत भारताचा सहावा क्रमांक लागतो. म्हणजे खरतर मानसिक आरोग्याला आपल्याकडे प्राधान्यक्रम असला पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही. कोविड किंवा कोरोना हा आपल्यासाठी असाच शारीरिक आणि मानसिक समस्या घेऊन आला. कोविडमुळे निर्माण झालेल्या मानसिक समस्या आणि टाळेबंदीमुळे (श्रेलज्ञवेुप) निर्माण झालेल्या समस्यांमध्येही फरक करायला हवा. सुरुवातीच्या काळात दोन टोकाच्या प्रतिक्रिया दिसल्या. एकीकडे टोकाची बेफिकिरी आणि दुसरीकडे टोकाचा ताण. काही माणसे जणू काही घडतच नाहीये अशा प्रकारे वागत होती. गर्दी करणं, मास्क न वापरणं, गरबा खेळणं असे अनेक प्रकार त्यातून घडले. कोविडमुळे निर्माण झालेला सुरुवातीचा ताण, हा या आजाराची एक तर नीट माहिती नव्हती किंवा अनेक गैरसमज होते, त्यामुळे वाढल्याचे जाणवले. नेमका संसर्ग कशाने होतो, हेच अनेकांना माहीत नव्हते. हवेद्वारे विषाणू पसरतो का?, मांसाहार केल्याने होतो का?, गरम पाणी पिल्याने विषाणू मरतो का?, नेमकी काय काळजी घेतली, तर संसर्ग होणार नाही, बाहेरून आणलेल्या वस्तू कशा वापरायच्या वगैरे अशा एक ना अनेक प्रश्नांनी चिंता वाढलेली दिसली. त्याचबरोबर अनेक अशास्त्रीय दावे या गोंधळामध्ये भर घालतच होते. गरम पाणी पिल्याने, वाफ घेतल्याने, गोमुत्र पिल्याने करोना मरतो, या अशास्त्रीय दाव्यांचे खंडन करणारी कोणतीही यंत्रणा नसल्याने भावनिक गोंधळ आणि मानसिक ताण दोन्ही गोष्टींमध्ये वाढ झालेली आढळली.

टाळेबंदीमुळे झालेला मानसिक त्रास : मुळातच कोणत्याही प्रकारचा अचानक झालेला बदल किंवा अनिश्चितता मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करते. टाळेबंदी काही लोकांसाठी आपत्ती म्हणून आली, काहींसाठी मानसिक ताण म्हणून तर काहींसाठी नित्यक्रमातील बदल म्हणून. समाजातील मोठा गट, जो रोजंदारीवर जगतो, त्यांच्यासाठी टाळेबंदी आपत्ती म्हणून आली. अचानक झालेल्या घोषणांनी कोणालाच कोणतेही नियोजन करता आले नाही, पण अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. काहींचे मृत्यू उपासमारीने झाले. या सगळ्या लोकांसाठी जिथे जगणं अवघड झालं तिथे मानसिक आरोग्याच्या सुविधा म्हणजे श्रीमंती (र्र्श्रीुीीू) म्हणावी लागेल. मृत्यूमुखी पडलेल्या लोकांबरोबर जे होते, त्यांच्यासाठी मात्र हा आयुष्यभराचा मानसिक आघात होऊ शकतो. त्यांच्या मानसिक आरोग्याचं काय? जवळच्या व्यक्तींच्या मृत्यू पाहावा लागला तर आघातानंतरचा मानसिक परिणाम या सारखे आजार होऊ शकतात. पण त्याची दखल घेण्यासाठी आणि उपचार करण्यासाठीची यंत्रणा आपल्याकडे नाही. स्थलांतर कराव्या लागणार्‍या मजूर वर्गाबरोबरच असे अनेक घटक आहेत, ज्यांच्यासाठी टाळेबंदी आपत्ती म्हणून आली आणि त्याबरोबर मानसिक आरोग्याच्या समस्याही आल्या.

कोरोना आणि मानसिक ताण : समाजातील एक गट असा आहे, ज्यांच्यासाठी हा काळ आपत्ती बनून आला नाही, पण त्यांचा मानसिक ताण निश्चितच वाढला होता. काही लोकांना कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना रेड झोनमध्ये सर्व्हेक्षणाची, आरोग्य तपासणीची कामं करावी लागली असे लोक. शिक्षक तसेच असे लोक ज्यांच्या नोकर्‍या गेल्या किंवा पुढे जातील. काहीच्या पगारामध्ये कपात झाली. जे एकटे राहत आहेत किंवा ज्यांचे नातेवाईक त्यांच्यापासून लांब आहेत. असेही अनेक लोक होते, ज्यांची आर्थिक परिस्थिती तशी बरी आहे, पण कल्पनांनी ताण वाढला आहे. उद्या किराणा मिळालाच नाही तर? माझ्या जवळच्या माणसांना संसर्ग झाला तर? मला योग्य उपचार मिळालेच नाही तर? अशा अनेक विचारांनी माणसांना त्रास होत होता आणि अजूनही होत आहे. ज्यांचे काम पूर्णपणे घरून चालू आहे आणि घर आणि कामाचं ताळतंत्र सांभाळवं लागतंय. अशा लोकांना गंभीर मानसिक आजारांना सामोरे जावे लागले नाही, पण ताण वाढून त्याचा परिणाम आरोग्यावर निश्चितच झालेला दिसत आहे. विविध सरकारी खात्यांमध्ये एकवाक्यता नसणं हेही ताणाचं कारण आहे.

मानसिक आरोग्याच्या सुविधा पुरवणे : जसे वैद्यकीय सेवा या अत्यावश्यक मानल्या जातात, तशाच मानसिक आरोग्याच्या सुविधाही असायला हव्यात. हे खरच शक्य आहे का? सरकारी पातळीवर अशा सुविधा सरकारला पुरवता येऊ शकतात का? तर त्याचं उत्तर केरळ सरकारने दिले आहे. तिथे जवळपास तीस हजार लोकांनी मानसिक आरोग्याच्या सेवांचा लाभ घेतला. सेवांना लागणारा वेळ व होणारा खर्च लक्षात घेता, आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने चालणारी मनोसोपचार पद्धती अवघड आहे. समुदाय मानसोपचार (र्लेााीपळीूं िीूलहेींहशीरिू) सारख्या पर्यायाचा विचार नक्की होऊ शकतो. यासाठी सरकारी पातळीवर पुढाकार आवश्यक आहे. एकूणच कोरोना आपल्याला पुढचे काही महिने पुरणार असे दिसते. आधी आपण गाफिल राहिलो पण पुढील महिने कमीत कमी मानसिक त्रास कसा होईल याबाबत उपाय योजना आवश्यक आहेत. -गौरी जानवेकर, समुपदेशक आणि मानसशास्त्र अभ्यासक

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply