Breaking News

विनाकारण फिरणार्‍यांना दणका; रेवदंडा पोलिसांची कारवाई; दंड वसूल

रेवदंडा : प्रतिनिधी

वीकेण्ड लॉकडाऊननंतर सोमवारी (दि. 19) सकाळी रस्त्यावर विनाकारण गर्दी करणार्‍या दुचाकीस्वार, पादचारी, व चारचाकी वाहनांच्या विरोधात रेवदंडा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. चौलनाक्यावरील चेकपॉईंटवर त्यांना अडवून त्यांच्याकडून दंडवसुली केली. चौलनाक्यावरील चेकपॉईंट परिसरात नाकाबंदी करुन रेवदंडा पोलिसांनी सोमवारी प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली. तसेच मास्क नसलेल्यांनासुद्धा हटकले. पोलिसांच्या या कारवाईने विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍यांची चांगलीच गोची झाली. अनेक मोटारसायकलस्वार व प्रवाशांनी मुख्यः रस्ता सोडून गल्लीबोळातून पोबारा करण्यास सुरूवात केली. त्यामुळे वनाकारण फिरणार्‍यांवर वचक बसून रस्त्यावरील गर्दीचे प्रमाण कमी झाले. दरम्यान, रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणास सुरूवात झाली असून अनेकांनी या लसीकरणाचा लाभ घेतला.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply