Breaking News

मायावतींच्या भावावर कारवाई; 400 कोटींचा प्लॉट जप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

बसपाप्रमुख मायावती यांचा भाऊ आणि बसपाचे उपाध्यक्ष आनंद कुमार आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात गुरुवारी (दि. 18) आयकर विभागाने मोठी कारवाई केली. आयकर विभागाने आनंद कुमार यांचा एक निनावी प्लॉट ताब्यात घेतला आहे. हा प्लॉट नोएडा येथे असून त्याची किंमत 400 कोटी आहे.

आयकर विभागाने आज आनंद कुमार यांच्या घरी जाऊन ही कारवाई केली असून त्यांच्या संपत्तीची झाडाझडती अद्यापही सुरूच आहे. या वेळी आनंद कुमार यांच्याकडे नोएडामध्ये 28,328 स्क्वेअर मीटरचा एक निनावी प्लॉट असल्याचे आढळून आले. सात एकरामध्ये पसरलेल्या या प्लॉटची किंमत सुमारे 400 कोटी आहे.

दिल्लीतील बीपीयूने या निनावी प्लॉटला जप्त करण्याचे 16 जुलै रोजी आदेश दिले होते. त्यामुळे आज आयकर विभागाने हा प्लॉट जप्त केला आहे. आनंद कुमार यांच्या आणखी काही बेहिशेबी मालमत्तांची माहिती आपल्याजवळ असल्याचा दावा आयकर विभागाच्या सूत्रांनी केला आहे. भविष्यात या मालमत्ता जप्त करण्यात येणार असून त्याचे थेट कनेक्शन मायावतींशी असल्याचेही बोलले जात आहे.

– संपत्तीत 18000 टक्क्यांनी वाढ दरम्यान, आनंद कुमार याच्या 1300 कोटींच्या संपत्तीची तपासणी सुरू आहे. 2007 ते 2014पर्यंत आनंद कुमार यांच्या संपत्तीत 18000 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यांची संपत्ती 7.1 कोटीने वाढून 1,300 कोटी झाली आहे. त्यांच्या 12 कंपन्याही आयकर विभागाच्या चौकशीच्या फेर्‍यात आहेत.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply