पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्यातून 2515 लेखाशीर्ष अर्थात मूलभूत सुविधा अंतर्गत एक कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.
यानुसार पनवेल विधानसभा क्षेत्रातील वाकडी ते दूंदरे रस्ता डांबरीकरण करणे (ओडीआर-खर्च 20 लाख रुपये), कोळवाडी येथे रस्ता डांबरीकरण करणे (खर्च 10 लाख रुपये), वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायत हद्दीतील वांगणी तलाव सुशोभीकरण करणे (खर्च 10 लाख रुपये), उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील उसर्ली गावातील गणपती घाटापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे (खर्च 10 लाख रुपये), चिंध्रण गावात अंतर्गत गटार बांधकाम करणे (खर्च 10 लाख रुपये), शिवकर गावातील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे (खर्च 10 लाख रुपये), पाली देवद ग्रामपंचायत हद्दीतील सुकापूरमधील न्यू ओम शक्ती सोसायटी ते कार्तिक सोसायटीपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे (खर्च 15 लाख रुपये), शिवम सोसायटी ते विसपुते कॉलेज देवद येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे (खर्च 15 लाख रुपये) ही कामे आमदार प्रशांत ठाकूर यांनी 2515 लेखाशीर्ष अर्थात मूलभूत सुविधा अंतर्गत करण्याची मागणी करून त्या संदर्भात सतत पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने या विकासकामांना शासनाकडून मंजुरी मिळाली आहे.
शहरांचा विकास करताना आमदार प्रशांत ठाकूर ग्रामीण भागाला कधीच विसरले नाहीत. गावांनाही निधी देत गावांचा विकास करण्याचा त्यांचा नेहमीच प्रामाणिक प्रयत्न असतो. त्यानुसार येत्या पावसाळ्यापूर्वी ही विकासकामे पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …